बहुगुणी आवळा

आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

ज्यांना पोट साफ होण्यास त्रास होतो. मलावरोध असतो, त्यांनी नियमीतपण आवळ्याचा रस अथवा आवळा खावा. याने पोट नियमीतपणे साफ होऊ लागते.

आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे फळ आहे. हिवाळ्याच्या प्रारंभी म्हणजे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा लहान आकारातील आवळा हा रसपूर्ण नसल्याने त्याचा वीर्य वाढीच्या दृष्टीने पाहिजे तसा नसल्याने

फायदा होत नाही. परंतु डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आपल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो.

'सी' व्हिटॅमिनने पूर्ण
आधुनिक रासायनिक विश्लेशषाच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्या अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात व संत्र्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त 'सी' व्हिटॅमिन आढळते.

त्रिदोषनाशक
डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आपण वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापरतो.

आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक ही म्हटले जाते.

आवळ्याचे अन्य गुण
आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!