शरीर स्वस्थ ठेवण्याचा मूलमंत्र


Related image

सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे.
  • मलमूत्र, शिंकम अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायु व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोकु नये.
  • कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठिक राहते.
  • धैर्याने काम केल्यास बुद्धि ठिक राहते. पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो.
  • अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी पाल्याने अपचन व अजीर्ण होते.
  • भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगलेनसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये. जाणल्या शिवाय मित्रता करू नये, हात धुतल्या शिवाय जाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्याचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शुत्रता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्ति पासून बचाव होऊ शकतो.
  • अतिव्यायाम, आति थट्टा विनोद, आति बोलणे, आति परिश्रम, आति जागरण, आति मैथुन, ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी आति कारणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्ट कारकच ठरते.
  • या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे ही विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी उन घेणे व रात्री थंदी पासून बचाव करणे हितकारी असते. परंतू उपाशी राहणे व उशीरा पर्यंत जागणे नुकसानकारक असते.
  • झोपवयास जाण्या अगोदर लघवी करणे, गोड दुध पिणे, दात घासून चुळ भारणे, हात पाय धुणे, दिवसाभर केलेल्या कामावर मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणे. मानसिक आणि शारिरिक स्वास्थासाठी हितकार असते. जेवताना आणि झोपतना मन एकाग्र असते. जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी जे काही उपलब्ध असेल ते बारीक सॅलेड करून खाणे.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!