गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

फक्त 15 मिनिटांचा हा प्रयोग 350 असाध्य रोग नष्ट करतो, मग ते कैंसर, किडनी फेल, सांधेदुखी, लिवर सर्वावर एकमेव गुणकारी उपाय
आजकाल आपली लाईफस्टाईल फार चेंज झाली आहे प्रत्येक ठिकाणी घाई आणि गडबड सुरु असते. यातच आपल्याला स्वताकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नंतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. पण जर आपण शरीराकडे थोडे लक्ष दिले आणि दिवसातले फक्त 15 मिनिट स्वतासाठी काढले तर हा प्रयोग करण्यासाठी दिले तर तुम्ही अनेक आजारा पासून मुक्त राहू शकाल. तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. कारण जीवनाचे सुख हे निरोगी शरीरात आहे.

जीवन आणि मरणाच्या मध्ये झगडत असलेल्या रोग्यास ग्व्हांकुराच्या रसाचे 4 मोठे ग्लास दिले जातात.

जीवनाची आशाच ज्या रुग्णांनी सोडली आहे त्यांना पण तीन ते चार दिवसात किंवा त्याही पेक्षा कमी वेळेत चमत्कारीक फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

जर गव्हांकुर रसाचे फायदे रुग्णाला एवढ्या जास्त प्रमाणात मिळतात तर निरोगी व्यक्तीस किती तरी जास्त मिळतील?

जर तुम्हाला पण निरोगी राहायचे असेल तर ही पोस्ट काळजीपुर्वक वाचा आणि निरोगी शरीर मिळवण्यासाठी आजच खालील प्रमाणे प्रयोगास सुरुवात करा.

गव्हांकुराच्या रसाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत

गव्हाचे दाणे पेरल्यावर त्याचे गवत उगवते त्यास गव्हांकुर म्हंटले जाते. नवरात्री मध्ये आपण घटामध्ये गहू पेरल्यावर उगवलेले गव्हांकुर तुम्ही पाहिले असेलच. गव्हांकुर निसर्गाकडून माणसाला मिळालेल्या गुप्त औषधीचे अक्षय भंडार आहे.

शरीराच्या आरोग्यासाठी हा रस एवढा प्रभावी ठरला आहे की विदेशी जीवविज्ञानिकांनी यास ‘हिरवे रक्त’ (Green Blood) म्हणून संबोधले आहे. डॉ. एन. विगमोर नावाच्या विदेशी महिलेने गव्हाच्या कोमल अंकुरा पासून अनेक असाध्य रोग नष्ट करण्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत.

गव्हांकुराच्या मदतीने केलेल्या उपचारात 350 हून जास्त रोगात आश्चर्यजनक परिणाम दिसून आले आहेत. जीव-वनस्पतीशास्त्र मध्ये हे प्रयोग अत्यंत मूल्यवान आहेत.

गव्हांकुर मध्ये रोगाचे उच्चाटन करण्याची विचित्र शक्ती विद्यमान आहे. शरीरासाठी हे एक शक्तिशाली टॉनिक आहे.

यामध्ये नैसर्गिक पणे कार्बोहाईड्रेट आदि सभी विटामिन, क्षार आणि श्रेष्ठ प्रोटीन असते. याच्या सेवना मुळे असंख्य लोकांना विविध प्रकारच्या रोगा पासून मुक्ती मिळाली आहे.

कैंसर, किडनी स्टोन, हृदयरोग, लीवर, डायबिटीज, पायरीया, दाताचे अन्य रोग, कावीळ, लकवा, दमा, पोट दुखी, पचनक्रिया सुधारते, गैस, विटामिन ए, बी, इत्यादीमुळे झाले आजार दूर करते, सांधेदुखी, सांध्यात सूज येणे, स्कीन एलर्जी, कमकूवत नजर, पांढरे केस, केसांचे गळणे, त्वचे वरील घाव तसेच भाजलेली त्वचा इत्यादीत फायदेशीर आहे.

हजारो रुग्णांनी आणि निरोगी लोकांनी आपले दैनंदिन आहारात कोणताही बदल न करता गव्हांकुराचा रस आपल्या आहारात समाविष्ट करून चमत्कारीक लाभ मिळवले आहेत.

लोक अनुभव सांगताना म्हणतात की त्यांना ताजेतवाणे वाटते, नजर तीक्षण झालेली वाटते, थकवा जाणवत नाही, कार्यक्षमता वाढलेली जाणवते.
गव्हांकुर उगवण्याची पद्धत

एक मातीचे भांडे घ्यावे किंवा कुंडी घ्यावी. त्यामध्ये खत मिश्रित माती घ्यावी. रासायनिक खताचा वापर बिलकुल करू नये. पहिल्या दिवशी कुंडीतील सर्व माती झाकल्या जाईल एवढे गहू पेरावेत. पाणी टाकून कुंडीला सावलीत ठेवा. सूर्याचा प्रकाश कुंडीला सरळ आणि प्रखर मिळणार नाही याची काळजी घ्यावी.

दुसऱ्या दिवशी दुसरी कुंडी घेऊन वरील प्रमाणे गहू पेरावेत असे नऊ दिवस नऊ कुंड्या तयार कराव्यात. सर्व कुंड्यांना दररोज पाणी द्यावे. नऊव्या दिवशी पहिल्या कुंडी मधील उगवलेले गहू कापून उपयोगात आणावेत. रिकाम्या झालेल्या कुंडी मध्ये पुन्हा गहू पेरणी करावी. असे दुसऱ्या दिवशी दुसरी कुंडी तिसऱ्या दिवशी तिसरी कुंडी असे क्रमाने करत राहावे. या प्रक्रियेत चुकून ही प्लास्टिकच्या भांड्यांचा आणि कुंडीचा वापर करू नये.

प्रत्येक कुटुंबाने आपल्या गरजे नुसार कुंड्याचे गव्हांकुर किती प्रमाणात उगवायचे हे स्वता ठरवावे. फक्त या कुंड्यांना दुपारच्या प्रखर उन्हात ठेवू नये. सकाळ आणि संध्याकाळ ठेवल्यास हरकत नाही.

सामान्य पणे आठ-दहा दिवसात गव्हाचे हे अंकुर पाच ते सात इंच वाढतात. हे अंकुर अतिशय गुणकारी असतात. जस जसे अंकुर सात इंचां पेक्षा मोठे होत जातील तसे त्यांचे गुण कमी होत जातात. त्यामुळे सात इंच वाढण्यापूर्वीच त्यांचा वापर करावा.

तुम्ही अंकुर कैची ने कापून किंवा समूळ उपटून वापरू शकता. खाली झालेल्या कुंडीत पुन्हा गहू पेरणी करा अश्या प्रकारे दररोज एका कुंडी मधून तुम्हाला अंकुर काढायचे आहेत आणि पुन्हा नवीन गहू पेरणी करायची आहे.
गव्हांकुर बनवण्याची कृती

पाच ते सात इंच अंकुर वाढल्या नंतर ते कापावेत किंवा समूळ उपटावे त्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. धुतल्यानंतर लगेचच त्यांना कुटावे. कुटल्यावर लगेच यांना कपड्याने रस काढावा. असे तीन वेळा कुटून पुन्हा रस काढण्यामुळे जास्तीत जास्त रस मिळेल.

ही सर्व प्रक्रिया करताना वेळ वाया घालवू नये एका नंतर एक त्वरित प्रक्रिया करत राहावी कारण मध्ये वेळ वाया घालवल्यास त्याचे गुण कमी होतात आणि तीन तासात तर त्याचे सर्व पोषक तत्व नष्ट होतात. सकाळी रिकाम्या पोटी रस घेण्यामुळे जास्त फायदा होतो.

तसे पाहता दिवसातून कधीही तुम्ही हा रस घेऊ शकता पण हा रस घेण्याच्या अर्धा तास अगोदर आणि अर्धा तास नंतर तुम्हाला काहीही खायचे किंवा प्यायचे नाही आहे.

सुरुवातीला रस पिण्यामुळे मळमळ होणे, उलटी येणे किंवा सर्दी होणे असा त्रास होऊ शकतो पण त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

शरीरात किती विषतत्व जमा झाले आहेत हे त्याचे प्रमाण आहे. सर्दी, जुलाब किंवा उलटी झाल्यामुळे हे शरीरात एकत्रित जमा झालेले विष निघून जाते.

गव्हांकुराचा रस काढताना त्या मध्ये मध, अद्रक, नागरवेलीची पाने (खाण्याची पाने) पण त्यामध्ये टाकू शकता.

यामुळे चव आणि गुणांमध्ये वाढ होईल आणि मळमळ होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गव्हांकुरात कधीही मीठ किंवा लिंबू कधीही टाकू नये.

रस काढण्याची सुविधा नसेल किंवा त्रास वाटत असेल तर गव्हांकुर चावून खालले तरी चालेल. यामुळे दातांच्या हिरड्या मजबूत होतील. तोंडाची दुर्गंधी येत असेल तर दिवसातून तीन-चार वेळा गव्हांकुर चावून खाण्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दिवसातून दोन किंवा तीन वेळा गव्हांकुराचा रस घ्यावा.

सर्वोत्तम आणि स्वस्त का आहे हा उपाय

गव्हांकुरा मध्ये दुध, दही आणि मटन-चिकन पेक्षा जास्त पटीने गुणकारी आहे. दुध आणि मांसात जे फायदे नसतात त्यापेक्षा जास्त फायदे या रसात आहेत.

तरीही दुध, दही आणि मांसापेक्षा स्वस्त आहे. घरी उगवल्यास नेहमी उपलब्ध आहे. अति गरीब व्यक्ती पण या रसाचा वापर करून आपले आरोग्य सुधारू शकतो.

नवजात मुलांपासून ते वृद्धा पर्यंत सर्व याचा वापर करू शकता. नवजात बालकास पाच थेंब रस देऊ शकता.

गव्हांकुरात जवळजवळ सर्व क्षार आणि विटामिन उपलब्ध आहेत. त्यामुळे शरीरात कोणत्याही घटकाची कमी असल्यास त्याची पूर्ती आश्चर्यकारक पणे गव्हांकुर करतात.

याच्या मदतीने प्रत्येक ऋतूमध्ये नियमित प्रमाणत प्राणवायू, खनिज, विटामिन, क्षार आणि शरीरविज्ञान मध्ये सांगितलेल्या कोषांना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व तत्व मिळवले जाऊ शकतात.

गव्हांकुराचे रस घेणे सुरु करा आणि फक्त तीन आठवड्यात आपल्या कमजोर झालेल्या शरीरात पुन्हा स्फूर्ती, टवटवीतपण आणि ताजेपण घेऊन या.

गव्हांकुराचा रस पिण्यामुळे कैंसर सारखे असाध्य रोग नष्ट झाल्याचे पाहण्यात आले आहे. शरीर निरोगी झाल्याचे दिसले आहे.

Comments

Popular posts from this blog

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!