मधाचे आश्चर्यकारक फायदे..!

मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्याआरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईल. 
मध (honey) मध हे सर्वांना परिचयाचे आहे. तसेच ते किती औषधी आहे ते पण माहीत आहे. मध हे विविध प्रकारच्याफुलांमध्ये असते. मधमाश्या त्या फुलांमधून मध शोषून आपल्या शरीरात त्याचा साठा करून मग आपल्या पोळ्यामध्येलहान लहान कोषात साठा करून ठेवतात. मध हे उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ आहे.

मध हा चिकट, पारदर्शक, सुगंधी, मधुर व पाण्यात विरघळून जाणारे एक द्रव्य आहे. मध हे मुख्यत्वे दोन प्रकारचेआहेत. एक “माखीयू” व दुसरे “कृतियू” आहे. माखीयु कसे ओळखायचे तर ज्या मधाच्या पोळ्यातील मधमाशी उडवलीजात असता तीव्र दंश करते त्या मधाला माखीयू मध असे म्हणतात व ज्या मधाच्या पोळ्यावर दगड फेकून उडवण्याचाप्रयत्न केला असता ज्या माश्या दंश न करता उडून जातात त्यांना कृतियू मध असे म्हणतात. ह्या दोन्ही मधाच्यागुणधर्मात थोडा फार फरक आहे.

मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होते. मधामुळे आपल्या शरीराला उष्णता व शक्ती प्राप्त होते. मधातील आंबटपणामुळे उचकी व श्वसन संस्थेतील विकार दूर होण्यास मद्द होते. मधामध्ये जीवनसत्व “बी” चे प्रमाण अधिक आहेत्यामुळे त्याचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात.

मधाला आयुर्वेदात खुप गुणाकारी मानले जाते. मध हे फ्रक्टोज, ग्लूकोज, सुक्रोज, माल्टोज आणि शर्कराचे मिश्रण आहे.यामध्ये 75 टक्के साखर असते. याव्यतिरिक्त मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, चरबी, एंजाइम अमीनो अॅसिड,कार्बोहायड्रेट्स, आयोडीन आणि लोह, तांबे, मॅगनीज, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, क्लोरिन सारखेमानवी आरोग्यासाठी उपायकारक खनिज उपलब्ध असतात.

मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्याआरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तरहा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईल.

नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते.मध वजन घटवते आणि वजन वाढवतेही. 

मधाचे फायदे पुढील प्रमाणे
  • मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरातशक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.
  • कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यासखोकल्यात आराम मिळतो.
  • उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.
  • रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.
  • हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मधखाल्ले पाहिजे.
  • रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
  • मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावरलावल्यास फायदा होतो.
  • उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.
  • पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.
  • मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशालीआहे.
  • टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.
  • मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणेआणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.
  • मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!