पालक भाजीचे फायदे

पालकाला एक गुणकारी पालेभाजी मानली जाते, परंतु केवळ हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतो. या भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे.

या भाजीच्या विविध प्रकारच्या सेवनामुळे विविध आरोग्यविषयक तक्ररी दूर होतात. या भाजीचे आरोग्य विषयक फायदे कोणते ते पाहणारा आहोत.
१. पालकाच्या एक ग्लास ज्यूसमध्ये चवीनुसार काळे मीठ टाकून सेवन केल्यास दम आणि श्वासाच्या आजारामध्ये लाभ होईल.

२. ताज्या पालकाचा रस दररोज पिल्यास स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आयोडीन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.

३. कावीळ झालेल्या रुग्णाला पालकाचा आणि कच्च्या पपईचा रस एकत्र दिल्यास आराम मिळेल.

४. लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज पालकाच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे रक्तर प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.

५. थायरॉइडचा त्रास असल्यास एक ग्लास पालकाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चतुर्थांश जिऱ्याचे चूर्ण टाकून सेवन केल्यास लाभ होईल.- एनिमिया किंवा शरीरात रक्ताची कमतरता असेल्यास दररोज पालकाचा एक ग्लास रस अवश्य घ्यावा.

६. हृदयरोग असणाऱ्यांनी आजार असलेल्या लोकांनी दररोज एक कप पालकाच्या रसाचे २ चमचे मध टाकून सेवन करावे.

वरील उपाय करण्याआधी तुमच्या तब्बेतीनुसार सेवनाचे प्रमाण जणून घेण्याकरता डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच कदाचित काही व्यक्तींना पालकाची ऍलर्जी असण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच पालक हा चांगल्या प्रकारचा असावा. त्याचे कोणत्याही प्रकारात सेवन करण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेणे अत्यंत आवश्यक

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!