सर्दी खोकल्यावर रामबाण घरगुती ऊपाय

आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही, त्याला न जुमानता लोकांना सातत्याने सर्दी-खोकल्याचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो. 
  • लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडुन ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते. 
  • चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकुन दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यासही खोकला कमी होतो. 
  • नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुफुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते. 
  • काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्यापासुन आराम मिळतो. 
  • हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. हा अगदी साधासोपा ऊपाय आहे. 
  • आवळा पावडर व मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते. 
  • पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, १ चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो. 
पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा चमचा खसखस पेस्ट, ३-४ चमचे नारळाचे दुध आणि चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोपताना घेतल्यास त्यानेही कोरडा खोकला कमी होतो. १०० ग्रॅम पाण्यात भिजवलेली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवावा. झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही. तुळस आणि बडिशेपेचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे.

कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ-संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी. खोकल्याबरोबरच श्वसनसंस्थेतील इतर बिघाड थोपवण्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळावीत. कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासुन तात्काळ आराम मिळतो. कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम (कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवावे व नंतर त्याचे सेवन करावे. 

सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा. हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी. वरील साधे-सोपे, नैसर्गिक, घरगुती व कोणतेही दुष्परिणाम नसलेले ऊपाय वापरून हिवाळा कसा सुसह्य होतो हे आजमावुन पहा.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!