आरोग्यदायी कोरफड (Aloe Vera)

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसाव हे परंपरागत आयुरवैदिक औषध बनते.
कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. 

आरोग्यदायी कोरफड

▪वजन घटण्यास मदत होते

▪शरीर डिटॉक्स होते

▪सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो

▪संधिवाताच्या वेदना कमी होते.

▪पचनक्षमता वाढते

▪योनसंक्रमणास प्रतिबंध होतो

▪दातांचे आरोग्य सुधारते

▪रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कोरफड ही आफ्रिका, अरबस्तान व भारतासह दक्षिण आशिया येथे उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये गराच्या रूपात पाणी साठवलेले असते.
उपयोग
कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर, बलदाती अशा विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!