अपचन झाल्यास


अपचन - अन्नपचन योग्य न झाल्यामुळे पोट फुगणे, दुखणे व अस्वस्थता ही लक्षणे असलेल्या विकाराला ‘अपचन’ असे म्हणतात. पचन तंत्रात रचनात्मक बिघाड नसून पचनक्रियेत दोष उत्पन्न झाल्यास ही संज्ञा वापरतात.

* अपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे, ताजे आले आणि कडीपत्ता गरम पाण्यात घाला. थोडा वेळ पाणी तसेच ठेवा. नंतर या पाण्यात १ कप पाणी घालून गाळून घ्या.
* पोटात कृमी झाल्यास लसणाच्या ३-४ पाकळ्या काही दिवस सकाळी खाव्यात.
* घसा बसल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा उत्तम उपाय आहे.
* रात्री नाक चोंदल्यास नाकाच्या बाहेरील बाजूने राईचे तेल चोळल्याने श्वास घेणे सुलभ होते.
* घश्यात खवखवत असल्यास किंवा खोकल्याची उबळ येत असल्यास एखाद दुसरी काळी मिरी तोंडात ठेवावी.
* घामोळ्यामुळे कंड सुटल्यास शरीरावर दही चोळावं. १५ मिनीटानंतर धुवून टाकावं. हा उपचार काही दिवस चालू ठेवावा.
* उन्हाळ्यात खूप उष्मा वाढू लागल्यास शरीर थंड ठेवण्यासाठी २ ग्लास पाण्यात १ टीस्पून बडीशेप घालून उकळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ काही दिवस घ्यावे.
* अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात चिमूटभर मीठ घालून प्यावे. यामुळे वेदना थांबून अतिसार काबूत येतो.
* नागीण किंवा इतर त्वचारोगांवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे तुळस. तुळशीची पाने वाटून किंवा पानाचा रस बाधीत त्वचेवर चोळावे.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!

समतोल आहार