लसूण (Garlic)
वापरले जाणारे भाग: आतील गर/पाकळ्या.
औषध घेण्याचे प्रमाण: एका लसणाच्या ३ पाकळ्या २-४ दिवस चावाव्यात. सिरप: १ टेबलस्पून ३/दिवस. लेबलवर लिहिल्याप्रमाणे कॅप्सूल्स घ्यायाला हरकत नाही.
लसूण बलवर्धक, उत्तेजक-संप्रेरक, रक्तदाब कमी करणारा, झटक्यांना नियंत्रित करणारा आणि सुक्ष्मजंतू विनाशक इ. गुणधर्मांनी युक्त आहे, संसर्गांवर उपचार करण्यास तसेच परोपजीवी जंतूंचा नाश करण्यास मदत करते.
पेटका येणे, गोळे येणे यासाठी उपयुक्त ठरते. Echinacea आणि Goldenseal बरोबर वापरल्यास सूक्ष्म जीवाणूंचा नाश करते. यात allin असते, ते बॅक्टोरिया प्रतिबंधक असते, पण त्यासाठी लसूण चावला पाहिजे किंवा वाटून बारीक केला पाहिजे, म्हणजे त्यातील हा गुणधर्म दिसून येईल.
यावर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की एका मध्यम आकाराच्या लसणाच्या कांद्यात १००,१११ युनिटस पेनिसिलीन इतकी बॅक्टेरिया प्रतिबंधक शक्ती असते. ६००,०० ते १.२ मिलीयन युनिटस इतके पेसिलीन ज्या प्रकारचा संसर्ग असेल त्याप्रमाणे घ्यावे लागते. पण लसणाच्या मात्र ६-१२ पाकळ्या पुरेशा आहेत.
औषध घेण्याचे प्रमाण: एका लसणाच्या ३ पाकळ्या २-४ दिवस चावाव्यात. सिरप: १ टेबलस्पून ३/दिवस. लेबलवर लिहिल्याप्रमाणे कॅप्सूल्स घ्यायाला हरकत नाही.
Comments
Post a Comment