मुतखडा होण्याची कारणे

होमिओपॅथी आणि मुतखडा

Kidney Stone

१. प्रोटीयस (Proteus), सुडोमोनास (Pseudomonas) यासारख्या जीवाणूंमुळे वारंवार होणाऱ्या मूत्रमार्गाच्या संक्रमणातून युरिया (urea) निर्माण होते आणि त्याचा परिणाम मूत्रप्रवृत्ति थांबण्यात होतो.

२. लाल मांस, मासे, कॅल्शियम (calcium), टोमॅटो (tomatoes), दूध, पालक इत्यादीनी संपन्न असणारा आहार.

3. ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असणारा आहार.

४. उष्ण वातावरण आणि पाणी कमी प्रमाणात पिणे याचा परिणामी कॅल्शियम ओक्झलेटचे खडे (oxalate stones) तयार होतात. (शरीरातील निर्जलीकर्णामुळे)

५. गाउट (Gout ) आणि हायपरपॅराथायरॉइडीझम (hyperparathyroidism) .

६. अपुरे मुत्रोत्सर्जन आणि मूत्रप्रवृत्ति थांबणे

मुतखड्याचे प्रकार
१. कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे (Calcium Oxalate Stones)

२. फॉस्फेटचे खडे (Phosphate stones)

३. युरिक एसिडचे खडे (Uric acid stones)

४. सिस्टीनचे खडे (Cystine stones)

मुत्खड्याची चिन्हे आणि लक्षणे
१. मूत्रपिंडाच्या कोपऱ्यांमध्ये वेदना आणि सूज.

२. थंडी वाजून ताप येणे, मुत्रोत्सर्जनाच्या वेळी जळजळ होणे, मुत्रोत्सर्जनाचे प्रमाण वाढणे यासारखी मूत्रमार्ग संक्रमणाची वैशिष्ट्ये.

३. लघवीतून रक्त जाणे.

४. मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनी यांच्या एकत्र मिळण्याच्या ठिकाणी किंवा मूत्रवाहिनीमध्ये कोठेही खडा घट्ट अडकून राहिल्याने कमरेपासून मांडीच्या सांध्यापर्यंत पसरत जाणाऱ्या वेदना. (मूत्रवाही पोटशूळ)

मुत्खड्याचे उपद्रव
१. मूत्रपिंडामध्ये मूत्र साठून राहणे

२. मूत्रपिंडाच्या कटिरात अडथळा निर्माण होऊन संसर्ग होणे- क्वचित

३. मूत्रपिंड निष्क्रिय होणे -क्वचित https://goo.gl/posts/rW5xU

मुत्खड्याची तपासणी
१. अल्ट्रासोनोग्राफी (Ultrasonography) किंवा यूएसजी केयुबी (USG-KUB) ही तपासणी खात्रीशीर निदानासाठी पुरेशी आहे.

२. इतर कारणे शोधण्यासाठी रक्तातील युरिया (urea) आणि क्रियाटिनिनचे (creatinine) प्रमाण तपासणे.

३. मूत्राची कल्चर (culture) आणि सेन्सिटिव्हिटि (sensitivity) तपासणी.

४. वारंवार खडे होण्याच्या अवस्थेमध्ये सीरम कॅल्शियम (Serum calcium) आणि सीरम पीटीएच (serum PTH) तपासणी.

व्हेसीकल कॅल्क्यूलस (Vesical Calculus) तथा मूत्राशयातील खडा
याची वैशिष्टे
वारंवार मूत्रप्रवृत्ती
मूत्रप्रवृत्तीच्या शेवटी वेदना
हालचालींनी वेदना वाढणे आणि झोपल्यावर कमी होणे

अनुषंगिक उपाय
१. मूतखडा (किडनी स्टोन) होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणात सेवन करणे, त्यामूळे दिवसातून कमीतकमी ४- ५ लीटर पाणी सेवन करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.

२. सकाळी उठल्याबरोबर जास्तीतजास्त प्रमाणात पाणी प्यावे.

३. टोमॅटो, पालक, दूध, दुधाचे पदार्थ वर्ज्य केल्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.

4. जास्त कालावधीसाठी लघवी रोखून धरू नये.

५. ताकदीचा व्यायाम वर्ज्य करावा.

६. ड जीवनसत्वाची (Vitamin D) पूरक मात्रा वर्ज्य करावी.

7. सातूच्या पाण्याचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!