उदबत्ती, धूपचा धूर सिगारेट पेक्षाही धोकादायक

आपल्याकडे वातावरण आणि मन प्रसन्न करण्यासाठी देवपूजेसाठी घरात आणि मंदिरात अगरबत्त्यांचा वापर केला जातो. पण, अगरबत्ती आणि धूपचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षाही धोकादायक असतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

Image result for agarbattiअगरबत्त्यांच्या धुराने हृदयाशी संबंधित आजार, डोकेदुखी आणि कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात झालेल्या या संशोधनात दोन प्रकारच्या अगरबत्त्यांवर अभ्यास करण्यात आला. या दोन्ही प्रकारच्या अगरबत्त्या ९६ टक्के लोकांच्या घरी वापरण्यात येतात. तीन तासांपर्यंत एका खोलीत या अगरबत्त्या जाळल्या गेल्या आणि २४ तासांसाठी त्या बंद खोलीत मानवी फुफ्फुसांच्या पेशी ठेवण्यात आल्या. अगरबत्त्यांच्या धुरामध्ये असणाऱ्या कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसले. सिगारेटच्या धुरामुळेही अगदी असाच परिणाम होताना पाहायला मिळतो.

त्याचप्रमाणे अगरबत्ती व धूपाच्या धुरात ९९ टक्के अतिसूक्ष्मकण असतात. हे सूक्ष्मकण हवेत मिसळतात आणि श्वासावाटे फुफ्फुसात जाऊन तिथेच अडकतात. शरीरातील जिवंत पेशींना हे कण धोका पोहोचवतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सिगारेटच्या धुराच्या तुलनेत खूपच अधिक असते, असा अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!