अनशापोटी ही फळं खा
फळं खाण्याबाबत प्रत्येकाची आवड वेगळी असते. फळं खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असलं तरी योग्य वेळी खाल्ल्याने त्यातील घटकांचा फायदा मिळण्यास मदत होते. अनेकांना विशिष्ट फळं खाल्ल्यावर त्रास कमी करायचा असेल तर योग्य वेळी फळं खाण गरजेचं आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळं, टक्कल पडणं अशा समस्यांनी उपाशीपोटी फळं खाणं गरजेचं आहे. कोणती
फळं उपाशीपोटी खाल्ल्यास फायदा होईल याविषयी...- किवी - हे फळ पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमीन ई आरि फायबरचा समृद्ध स्त्रोत आहे. किवीमधील व्हिटॅमीन सी चं प्रमाण तुलनेत संत्र्यांच्या दुप्पट असतं.
- सफरदंच - या फळामध्ये सर्वात कमी जीवनसत्वं असतात पण यातील अँटीऑक्सीडंट्स आणि फलॅवेनाईड्समुळे व्हिटॅमिन सीच्या कार्यात मदत करतात. त्यामुळे आतड्यांचा कॅन्सरल हार्यी अटॅकसारख्या व्याधींना आळा बसू शकतो.
- स्ट्रॉबेरी - हे फळ अँटीऑक्सीडंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे. याच्या सेवनाने कॅन्सर, रक्तवाहिन्यामधील गुठल्या, फ्री रॅडीकल्स या व्याधींचा धोका कमी होतो.
- टरबूज - यामध्ये 92 टक्के पाणी असतं. यामधील ग्लुयाथिओन या घटकामुळे रोगप्रतिकारण शक्ती वाढते.
- पेरू - उपाशीपोटी या फळाचं सेवन केल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. यामुळे बद्धकोष्ठतेला आळा बसतो.
Comments
Post a Comment