एअर कंडिशनरचे (AC) 7 नुकसान

Image result for एयर कंडीशनर [AC] 7 नुकसान
एअर कंडिशनरमुळे उष्णतेपासून मुक्ती मिळते ती पण विना आवाजाने आणि आपल्या हिशोबाने तापमान कमी जास्तही करता येतं. हेच कारण आहे की लोकांना आता कूलरपेक्षा एसी लावणे अधिक सोयीस्कर पडतं. ऑफिसमध्येही 8 ते 10 तास आपण एसीमध्ये असतात पण काय आपल्या माहीत आहे की इतक्या इतक्या तास एसीत बसल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं? नाही... तर जाणून घ्या:

1 ताप किंवा थकवा- बराच वेळ एसीत राहिल्यामुळे आपल्याला हलका ताप किंवा थकवा वाटू शकतो. एवढंच नव्हे तर तापमान कमी जास्त केल्यामुळे डोकेदुखी, चिडचिड होऊ शकते. दुपारी एसीतून निघून सामान्य तापमानात आल्यावर ताप येण्याची शक्यता वाढते.

2 सांधेदुखी- सतत एसीत बसल्याने सांधेदुखीला सामोरा जावं लागतं. एवढंच नाही तर एसीमुळे शरीरही अकडतं आणि कार्यक्षमता क्षीण होते. भविष्यातही हाडासंबंधी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3 ब्लडप्रेशर आणि दमा- ब्लडप्रेशर संबंधित समस्या असणार्‍यांना तर एसीत बसणे टाळावे. यामुळे लो ब्लडप्रेशरची समस्या होऊ शकते. तसेच दमा रोगींनी ही एसीत बसणे टाळावे. याने श्वासासंबंधी त्रास उद्भवू शकतो.

4 लठ्ठपणा- हे ऐकून आश्यर्च वाटेल पण हे खरं आहे की एसीत बसल्याने लठ्ठपणा वाढतो. तापमान कमी असल्यामुळे शरीर सक्रिय नसून ऊर्जेचा योग्यप्रमाणे उपयोग होत नाही ज्यामुळे लठ्ठपणा येतो.

5 त्वचेसंबंधी समस्या- एसीचा दुष्प्रभाव त्वचेवर दिसून येतो. याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा हरवतो आणि त्वचा कोरडी पडायला लागते. ही प्रक्रिया हळू-हळू होत असते.

6 रक्तप्रवाह- एसीमध्ये बसल्यामुळे शारीरिक तापमान कृत्रिमरीत्या कमी जास्त होत राहतं ज्यामुळे पेशींचे आकुंचन होते आणि शरीरातील अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होत नाही, ज्याने शरीराच्या अवयवांची क्षमता प्रभावित होते.

7 मेंदूवर प्रभाव- एसीचा तापमान खूप कमी असल्यास मेंदूच्या पेशींचे आकुंचन होते ज्याने मेंदूची क्षमता प्रभावित होते. याने चक्कर येण्याची शक्यता असते.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!