पाणी पुरीचा शौक असल्यास हे नक्की वाचा...
फुटपाथवर पाणी पुरीचा ठेला बघून कोणाच्याही तोंडाला सहजच पाणी सुटेल, परंतू सावध राहा, हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण अनेक जागी हे तयार करण्यासाठी केमिकल्स वापरण्यात येतं.
खरं तर चौरस्त्यावर, फुटपाथावर आणि ठेल्यावर ज्या आंबट-तिखट पाण्यासोबत आपण पुरीचा आस्वाद घेत असता ते पाण्यात पुदिन्याऐवजी ऍसेस आणि आंबटाऐवजी टाटरिक अॅसिड किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर टॉयलेट क्लीनर (अॅसिड) देखील मिळालेले असू शकतं. होय पण मोठ्या आणि महागड्या दुकानांमध्ये स्वच्छता आणि सामुग्रीकडे विशेष लक्ष दिलीही जात असेल.
पाणी पुरीचा ठेला लावणारे सांगतात की महागाईमुळे कमी खर्चात स्वादिष्ट पाणी तयार करण्यासाठी सोपा उपाय आहे की पुदिना, काळं मीठ, लिंबू हे सर्व मिसळण्यापेक्षा ऍसेस, स्वस्त मसाले आणि टाटरिक अॅसिड वापरणे परवडतं. याने लागतही कमी लागते आणि पाणी स्वादिष्ट लागतं.
तसेच डॉक्टरांप्रमाणेदेखील ठेल्यावरील पाणी पुरीचे सेवन केल्याने डायरिया, डिहाइड्रेशन होण्याची आशंका असते. याचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने लिव्हरही विपरित परिणाम दिसून येतं. तसेच हे दुकानदार स्वच्छतेकडे मुळीच लक्ष देत नसल्याने याचे सेवन केल्याने उलटी, जुलाब, कावीळ सारखे आजार होऊ शकतात.
खबरदारी:
- तिखट पाणी ठेवलेल्या जारची आतील परत बघा. जर जार रंग सोडत असेल तर पाण्यात अॅसिडचा वापर केला जात आहे.
- स्टीलच्या प्लेट्समध्येही रंग परिवर्तन अॅसिड असल्याचे संकेत आहे.
- पाणी पुरी खाल्ल्यावर दातांवर काही पदार्थ जमल्यासारखं वाटत असल्यास यात केमिकल असावे जाणून घ्या.
- टाटरिक अॅसिड किंवा ऍसिटिक अॅसिड व एसेंसने तयार केलेलं पाणी पोटात गेल्यावर लगेच जळजळ होते.
- पाणी पुरी विकणार्याचे बोटं बघून पाण्याचा अंदाज लावू शकता.
धोका:
- अधिक प्रमाणात पाणी पुरीचे सेवन केल्याने अल्सर होऊ शकतं.
- अॅसिड असलेल्या पाण्याने लिव्हरवर प्रभाव पडू शकतं.
- अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते तसेच पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
- पोटदुखी आणि आतड्यांमध्ये सूज किंवा माउथ अल्सर होऊ शकतात.
Comments
Post a Comment