"ड" जीवनसत्वाचा अभाव
आपल्या शरीराला सर्वाधिक आवश्यक असलेले जीवनसत्त्व म्हणजे अ आणि ड. ही दोन जीवनसत्त्वे नसल्यास आपल्या आरोग्यावर फार गंभीर परिणाम होतात. ड जीवनसत्त्व हे सूर्यप्रकाशामध्ये विपुल प्रमाणात असते. आपला देश विषववृत्तावर वसलेला आहे आणि आपल्याला ड जीवनसत्त्व सहजपणे विनामूल्य मिळत असते. पण असे असूनही निसर्गाने आपल्याला दिलेले फुकटचे जीवनसत्त्व आपण घेतही नाही आणि त्याच्या अभावात अनेक धोक्यांना तोंड देतो. ड जीवनसत्त्वाच्या अभावी आपल्या जीवनामध्ये अनेक दोष निर्माण होतात. ते समजून घेतल्यास आपल्याला ड जीवनसत्त्व का आवश्यक आहे हे लक्षात येईल. आपले शरीर हाडांवर उभे असते आणि हाडे मजबूत असण्यावर आपल्या शरीराची तंदुरूस्ती अवलंबून असते. मात्र आपण ड जीवनसत्त्वाचा पुरेसा पुरवठा शरीराला केला नाही तर हाडे मजबूत राहत नाहीत. ती ठिसूळ होतात आणि थोड्याशाही लहानशा अपघाताने त्यांना फ्रॅक्चर होते. विशेष करून वृध्द वयामध्ये हा परिणाम फार तीव्रतेने जाणवतो. बरेच वृध्द लोक घराच्या बाथरूममध्ये घसरून पडतात आणि त्यांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले की कायमचे अपंग होऊन बसतात. अशा लोकांनी हाडे मजबूत व्हावीत यासाठी कष्ट घेतले असत...