सांधे का दुखतात..!
सांधेदुखीचे अनेक कारणे आहेत. 'सांधे आहेत म्हणून ते दुखतात !' असे उत्तर माझ्या आजोबांनी त्यांच्या मित्राला दिल्याचे मला अजून आठवते.
दोन हाडे एकमेकांना जोडण्यासाठी सांधे असतात. सांधे असल्यामुळेच शरीराची हालचाल होऊ शकते. सांध्यांमध्ये असलेल्या हाडांच्या टोकांभोवती एक कुर्चा असते. तसेच सांध्यांच्या पोकळीत एक द्रवपदार्थ असतो, जो वंगणासारखे काम करतो. म्हातारपणात हा द्रव कमी होतो. हाडे एकमेकांवर घासली जाऊ नयेत यासाठी ही रचना असते. वृद्धापकाळात या कुर्चेची झीज होते व हाडांची टोके एकमेकांवर घासून सांधे दुखायला लागतात. काही वेळा सांध्याच्या पोकळीत जंतूसंसर्गामुळे किंवा दुखापतीमुळे द्रव गोळा होतात व सूज येते. यामुळेही सांधे दुखायला लागतात. गाऊटसारख्या रोगात काही रासायनिक पदार्थांचे स्फटिक सांध्याच्या पोकळीत जमा होतात. साहजिकच सांधे दुखतात. लहान मुलांमध्ये हृदयाच्या आजारातही सांधे दुखतात. रोगप्रतिकारक संस्थेच्या काही रोगांमध्येही सांधेदुखी होते.
सांधेदुखीच्या कारणानुरूप त्यावर उपचार करायला हवेत. काही सर्वसाधारण उपचार लक्षात घेऊ.
- विश्रांती घेतल्याने सांधेदुखी कमी होते. दुखणाऱ्या सांध्यांना विश्रांती दिल्याने दुखणे कमी होते.
- सांध्यांना शेकून काढण्यानेही वेदना कमी होतात.
- ॲस्पिरिनसारख्या वेदनाशामक गोळ्यांनी वेदना कमी होते, तसेच सूजही कमी होते.
- वृद्धापकाळातील सांधेदुखीसाठी प्रत्येक सांध्यासाठीचे साधेसाधे व्यायाम नियमितपणे करायला हवेत, म्हणजे सांध्यांच्या हालचालींवर पडलेल्या मर्यादा दूर होतील.
- अशी सांधेदुखी पुर्णपणे बरी होत नसल्याने निदान दैनंदिन व्यवहार करणे तरी रुग्णाला शक्य होईल व आयुष्य सुखकर होईल.
Good information about the blog, Organic Herbal Juices Get rid of undesired body fat with highly effective Organic Herbal Juices. Regular intake of herbal juice drinks permanently alleviates obesity.
ReplyDeleteAloe Vera Mango Juice
Aloe Vera Orange Juice
Diabetic Care Juice
Noni Gold Juice