मुखपाक (तोडं येणे)

बोलीभाषा - तोडं येणे.
मुखपाकामध्ये तोंडाच्या आतील बाजुस आणि जिभेवर लहान लहान फोड येतात,त्याच्यामध्ये वेदना व दाह असतो.


कारणे
१.अति तिखट,तेलकट,खारट,अति गरम,आंबवलेले पदार्थ,बेकरीचे पदार्थ खाणे, मांसाहार करणे,विरुद्धाहार घेणे.
२.दुपारी झोपणे व रात्री जागरन करणे.
३.अति मनन अति चिंतन करणे,stress tension घेणे,अति रागावणे.
४.जेवणाच्या वेळा न पाळणे इ.कारणांमुळे शरिरातील पित्त दोष वाढुन शरीरांतर्गत उष्णता वाढते व त्यामुळे तोंड येते.

लक्षणे
१.जिभेवर व तोंडात फोड येतात,त्याच्यामध्ये दाह व वेदना असतात.
२.अंगामध्ये बारीक ताप असतो.
३.अन्न घेता त्रास होतो.
४.भुक मंदावते.
५.अजीर्ण असते.
६.बद्धकोष्ठता असते.
७.ग्रहणीचा( ulcerative colitis) त्रास असतो.

घरगुती आयुर्वेदीक उपचार.१.फोडांवर मध लावणे.
२.गायीचे साजुक तुप लावणे.
३.पाण्याचे प्रमाण वाढविणे.
४.काळ्या मनुका चावुन खाणे.
५.शहाळ्याचे पाणी पिणे.
६.गायीचे तूप व दुध शतावरी कल्पासह घेणे.
७.एक चमचा त्रिफळा एक कप कोमट पाण्यात मिसळुन गुळण्या करणे.
८.३-३ चमचे कोथिंबिरीचा रस घ्यावा.
९.रात्री २ च.ऐरंडेल तेल कोमट पाण्यासह घेणे.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!