योगासन - व्यायाम..!

योगासने
आजच्या जगात खूप फायदेशीर मानले जातात. योगामुळे शरीराला आणि मनाला शांती मिळते. अनेक आजारांवर योगामुळे मात केली जाऊ शकते. आयुर्वेदाच्या दिनचर्येत योगासने-व्यायामाचा समावेश केलेला आहे. योगासने-व्यायामाचे फायदे सांगताना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी शरीर आणि मन निरोगी असणं गरजेचं असतं. योगासने-व्यायामाच्या नित्य अभ्यासामुळे ते सहज शक्य आहे. व्यायामाचा उद्देश `व्यायाम स्थैर्यकराणाम्’ हा आहे. म्हणजेच शरीर स्थिर करण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. आजच्या बैठय़ा जीवनशैलीमुळे तसेच व्यायामाच्या अभावामुळे निर्माण होणार्या व्याधींच्या संख्येत वाढ होते आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे याचे प्रमाण वाढते आहे ते व्यायामाच्या अभावामुळेच.
Related image
आयुर्वेद व योगासने
योग ही प्राचीन भारतीय जीवन पध्दती आहे. आयुर्वेद आणि योग या दोन्ही शास्त्रांचं मूळ स्त्रोत `वेद’ आहे. यात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार केलेला आढळतो. निरोगी राहण्यासाठी शरीर आणि मन यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी योगासारखे दुसरे साधन नाही. योगासनं करताना स्नायूंची लवचिकता वाढवणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या आसनांमुळे शरीराचे सामर्थ्य वाढते.
योगासने-व्यायामाचे फायदे
* यओगासनामूळे शरीरात हल्केपणा जाणवतो,
* क्रयशक्ती वाढते,
* भूक वाढते,
* शरीरातील मेद कमी होतो.
* शरीर सुगठीत, रेखीव आणि कणखर होते.
* योगासनांमुळे शरीराची वाढ होते.
* शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, कांती सतेज होते, सर्व अवयव मोकळे होतात, जठराग्नि प्रदीप्त होतो. शरीराचा आणि मनाचा आळस दूर होतो. शरीर बळकट आणि चपळ होते. श्रम, थकवा, तहान, ऊन आणि थंडी सोसणे शक्य होते.
* आसनांच्या अभ्यासामुळे शरीरास सर्वांगसुंदर असा व्यायाम होतो.
* सर्व शरीरावर रक्ताभिसरणाची क्रिया संतुलित केली जाते.
* हृदय-फुप्फुस-यकृत-मेंदू इ. महत्त्वाच्या अवयवांचं स्वास्थ्य राखणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणेही योगासनांमुळे शक्य होते.
* शरीरास योगासनामुळे सुडौलपणा प्राप्त होतो,
* रोगप्रतिकारक क्षमता वाढते. प्राणायामामुळे नाडय़ा, फुप्फुसं, हृदय, मेंदू आदींची कार्यक्षमता वाढते. मनावरील ताण नाहीसा होतो. हृदयविकार, रक्तदाब आणि मानसिक विकारांवरही प्राणायाम लाभप्रद आहे.
* योगासनामुळे उत्तम आरोग्यही प्राप्त होते. जन्मतः शरीराचे बल असते ते काळानुसार कमी जास्त होते. प्रौढत्वात बळ कमी होत जाते. म्हणून बल वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी व्यायाम-योगासने आवश्यक असतात. स्थूलपणा कमी करण्यासाठी व कमी झालेले वजन टिकवून ठेवण्यासाठी योगासनांसारखा दुसरा उपाय नाही. मात्र आपले वय, शरीर, स्थिती, बल, देश, काल आणि आहार या सगळ्यांचा विचार करून योगासने प्रकार निवडावेत. तोंडाने श्वास घ्यावा लागणे, घशाला कोरड पडणे, कपाळ, नाक येथे घाम घेणे ही यथाशक्ती व्यायाम झाल्याची लक्षणं आहेत. जेवणानंतर दोन तास व्यायाम-योगासने करू नये. व्यायाम-योगासने झाल्यावर किमान एक तास काही खाऊ नये.
अशा प्रकारे `अपुनर्भव चिकित्सा’ म्हणून व्यायाम आणि योग यांचा वापर होतो. योगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो, गर्भवती महिलांना देखिल काही गोष्टीत काळजी घेऊन योग करण्याचा सल्ला दिला जातो.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!