हळदीचे दूध पिण्याचे फायदे..!

दुधात हळद टाकून पिणे हि एक पुरातन पद्धत आहे ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात.
बनवण्याची पद्धत :तुम्हाला दुधात अर्धा चमचा हळद पावडर किंवा एक इंच हळदीचा ताजा तुकडा मिसळायचा आहे. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे चांगले उकळून घ्या.
Related image
१. श्वसननलिके संबंधित आजारांवर फायदेशीर :हळदीचे दूध रोगाणूविरोधी आहे आणि हे बॅक्टेरियल संक्रमण आणि वायरल संक्रमणशी लढते. हे दूध तुमच्या शरीरातील तापमान वाढवते आणि फुफ्फुसांमधील रक्तसंचय आणि sinus मधून लवकर आराम देते. म्हणून हे श्वसननलिकेसंबंधी आजरांवर उपचारासाठी उपयोगी ठरते. हळदीचे दूध अस्थमा आणि ब्रॉन्कायटिस च्या इलाजासाठी देखील खूप उपयोगी आहे.
२. सर्दी खोकल्यावर उपचार :हळदी मध्ये अँटिसेप्टिक आणि सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. जे संक्रमणासोबत सर्दी आणि खोकल्याच्या लक्षणांशी लढण्यास मदत करतात. हे सुख्या खोकल्याविरुद्ध विशेष प्रभावशील आहे.

३. रक्तभिसरण क्रिया सुधारते :ह्या शक्तिशाली मसाल्याचा पूर्वीपासूनच आयुर्वेदातील औषधात एक रक्तशोधकाच्या रूपात उपयोग केला जातो. हे रक्ताभिसरण प्रक्रियेत सुधार करते. हे तुमच्या लिव्हर द्वारा पूर्ण शरीराचे डिटॉक्सीफाय करण्यास सुद्धा मदत करते.

४. सांधेदुखी समस्येवर फायदेशीर :हळदी मध्ये सूज कमी करण्याचे गुणधर्म असल्यामुळे हे सांधेदुखी बरोबर सूज आणि जळजळ शांत करण्याचे काम करते. हे पेय हाडं आणि सांध्यांना मजबूत करतात. सोबत शरीराच्या लवचिकतेतही सुधार आणतात.

५. कॅन्सर वर उपचार :कच्च्या हळद पासून बनवलेले दूध स्तन, त्वचा, फुफ्फुस, prostate आणि पोटाच्या कॅन्सर ला रोखण्याचे काम करते. तसेच ह्यात सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. हे डीएनए ला नुकसान पोहोचणाऱ्या कॅन्सर पेशींना रोखतात आणि किमोथेरपीच्या साईड इफेक्ट ला कमी करतात.

६. नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते :ह्यामध्ये असलेले अँटिव्हायरल गुणधर्म तुमची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते आणि व्हायरस ची वाढ होण्यापासून रोखते. त्यामुळे तुम्ही हेपेटायटिस सारख्या संक्रमणापासून वाचू शकतात. संशोधनानुसार हे सुद्धा समोर आलं आहे कि हळद ऑजाइमार रोगाची वाढ कमी करते आणि कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा कमी करते.

७. चांगली झोप :हळदीचे गरम दूध झोपण्याच्या एक तास अगोदर प्यायल्याने चांगली झोप लागते. दुधामध्ये सेरोटोनिन आणि मेलॅटोनीन असतात जे मस्तिष्क (मेंदू) रसायनं आहेत जे तुमच्या झोपेच्या क्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतात. हळद तणाव कमी करते आणि तुमच्या शरीराला आराम देते.

८. महिलांच्या मासिक पाळीत फायदेशीर :नियमित हळदी सोबत दुधाचा एक ग्लास प्यायल्याने मासिक पाळीचा त्रास आणि अंतर्मन (Twitch) पासून अराम मिळतो.

हळदी दूध सुरु करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चिकित्सकांचा सल्ला अवश्य घ्या.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!