केस गळणे व टक्कल पडणे

केस गळणे व टक्कल पडणे : होमिओपॅथिक दृष्टिकोन
होमिओपॅथिक दृष्टिकोन:डोक्यावरील केस गळून टक्कल पडणे ही एक प्रमुख समस्या असून त्यास एलोपेशिया (alopecia) असे म्हणतात. आपल्या डोक्यावर साधारण एक लाखाच्यावर केस असतात. केस गळणे सामान्य बाब आहे. सर्वसाधारणपणे आपले दररोज १०० केस गळतात व नवे 100 केस उगवतात. टाळूच्या त्वचेमध्ये हेअर फॉलिकल्स (ग्रंथी) असतात, जे तीन टप्प्यांमध्ये कार्य करतात 

  • पहिला टप्पा : Anagen - या टप्प्यात केसांची वाढ होते.
  • दुसरा टप्पा : Catagen - या टप्प्यात केसांची वाढ खुंटते.
  • तिसरा टप्पा : Telogen - या टप्प्यात केस गळून नवीन केस निर्माण होणे चालू होते.
एखाद्या व्यक्तीच्या केसाचे प्रकार व त्यांची स्थिती यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती समजते.

टक्कल पडण्याचे प्रकार :
१. कायमचे टक्कल पडणे -

खालील कारणे असू शकतात :
  • संसर्ग
  • टाळूचा दाह
  • शारीरिक जखम किंवा मानसिक धक्का
या प्रकारात केसांची ग्रंथी गमावलेली असते. त्यामुळे केस परत येण्याची शक्यता कमी आहे.
    २. तात्पुरते टक्कल पडणे -याचे दोन प्रकार आहेत :
  • स्थानिक (Alopecia Areata)
  • सार्वत्रिक (Androgenetic Alopecia)
    स्थानिक (Alopecia Areata)
  • ह्याला अर्धवट टक्कल पडणे असेही म्हणतात
  • ही एक स्वयं रोगप्रतिकारक व्याधी आहे
  • बऱ्याचदा आपोआप पुन्हा केस येतात
    सार्वत्रिक (Androgenetic Alopecia)
  • ह्याला सामान्यतः टक्कल पडणे अथवा पुरुषांमध्ये आढळणारा टकलेपणा (मेल पॅटर्न बाल्डनेस) असे म्हणतात
  • टक्कल पडण्याचे सर्वसामान्य कारण
  • पहिल्यांदा कपाळावरचे केस गळतात मग माथ्यावरचे आणि शेवटी बाजूचे केस गळतात
    अन्य कारणे
  • पौष्टिक घटकांची कमतरता
  • जास्त ताप येऊन गेल्यावर
  • गर्भधारणेनंतर केस गळणे
  • तीव्र आजारपणानंतर
  • ताणामुळे
  • अनुवांशिकता
  • कर्करोगावरील औषधोपचारांमुळे
  • हेअर डायमुळे
    केस गळणे कमी करण्यासाठी उपाय
  • जास्तीत जास्त जीवनसत्त्वे व खनिजे असणारा आहार घ्यावा. विशेषतः फळे व हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश असावा
  • नियमित योग व व्यायाम करावा
  • केसांना कलप करणे (हेअर डाय) टाळावे
  • केस सारखे धुवू नयेत
  • केस जोरात विंचरू नयेत अथवा केसांना जोरात मालिश करू नये
  • ताण येण्यासंबंधीची करणे शोधावीत
    टक्कल पडण्याचे परिणाम
  • मानसिक अस्वास्थ्यमुळे व्यक्तिमत्व विकासामध्ये अथवा व्यावसायिक कामगिरीवर परिणाम होणे
  • केस गळण्यामुळे उदासीनता येऊ शकते
होमिओपॅथिक दृष्टिकोनएलोपेशिया (alopecia) अथवा टक्कल पडणे या व्याधीवर होमिओपॅथीमध्ये अनेक उपाय आहेत. परंतु टक्कल पडण्याचे नेमके कारण शोधून काढण्यास थोडा विलंब लागतो.
अधिक प्रभावी परिणामांसाठी घटनात्मक औषधोपचार पद्धतीबरोबरच या रोगजन्य कारणांवर औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.


सूचना - प्रत्येकवेळी औषध घेताना त्या व्यक्तीची विस्तृत वैद्यकीय पार्श्वभूमी तपासणे गरजेचे असते, त्यामुळे योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःहून कोणतेही औषध घेऊ नये. योग्य आहार, पथ्ये आणि नियमित व्यायामासह होमिओपॅथी औषधोपचार घेतल्यास टक्कल पडणे किंवा केस गळणे कमी होऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!