आरोग्य विषयक सामान्य माहिती ...


Related image

1.आयुर्वेदामध्ये “अनुपान” अशी एक संकल्पना आहे. म्हणजे औषध एकच पण ते वेगवेगळ्या पदार्थांबरोबर दिल्याने त्याचे गुणधर्म बदलतात.

2.आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला मोरावळा तयार करून आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी खावा.

3.आपल्या देशातील बहुतांश लोकांना व्हिटामिन 'डी' ची कमतरता आहे .याची कल्पना पण नसते. या कमतरते मुळे कोणत्याही मोठ्या आजाराची सुरुवात होऊ शकते .

4.चिंचेच्या कोळामध्ये डाएटरी फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

5.नैसर्गिक दात असतांना अन्नात मिसळनारी लाळ भरपूर आणि योग्य प्रमाणात असते . नवीन दात किंवा कवळी लावण्यानंतर तोंडामध्ये लाळ निर्मिती चे प्रमाण कमी होत असते .

6.बैठी जीवनशैली व गरजेपेक्षा अधिक आहार, बदलत्या जीवनशैलीमुळे सोयीसुविधा मिळतात मात्र नव्या व्याधींना निमंत्रणही मिळते.

7.तंत्रज्ञान आपले आयुष्य सोपे बनवते; पण आपण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने तणावाला निमंत्रण देतो आणि दुखणे विकत घेतो.

8.स्तनपानाच्या काळात आईच्या रक्तातील लोहाचं(iron) प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे बाळंतपणानंतर आईला लोहगुणयुक्त आहार देणं आवश्यक ठरतं.

9.आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो आम्लयुक्त असतो.हाच पाचक रस आवश्यकते पेक्षा जर जास्त प्रमाणात निर्माण होत असेल तर त्याला अ‍ॅसिडिटी असे म्हणतात.

10.हे तेल खाल्ले किंवा ते तेल खाल्ले की हृदयविकारापासून सुटका अशा जाहिरातीतील अगदी चुकीच्या आहेत .सर्वच प्रकारचे खाण्यायोग्य तेल अगदी प्रमाणात खावे .मात्र जीवनशैलीत बदल करावा .व्यायाम , योगासने , प्राणायाम व ध्यान या कायक्रमांना जीवनशैलीत अग्रक्रम द्यावा .

11.आपल्या शरीराला आनुवंशिक व्याधी त्या वयात होतच असतात.आपल्या चुकीच्या जीवनशैली मुळे आनुवंशिक व्याधी वेळे आधी होतांना दिसून येतात .

12.आपले शरीर आणि मन वेगवेगळे नाही. ते सतत जोडलेले आहे. शारीरिक आणि मानसिक आजार ही तणावाची कॉम्प्लीकेशन्स आहेत.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!