अॅलर्जी
अॅलर्जी म्हणजे निसर्गात असलेल्या काही घटकांना शरीर प्रतिबंध करते, त्यालाच अॅन्टीजेन असेही म्हणतात. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने दिसून येणारी लक्षणं म्हणजे श्वास लागणे, कफ, शिंका, वाहणारे नाक आणि खवखवणारा घसा, त्वचेवर रॅश(पुरळ) उठणे, खाज येणे, पित्त इ. अनेक केसेसमध्ये याची परिणती रक्तदाब कमी होणे, दम्याचा त्रास उसळणे किंवा कधी कधी मृत्यू होण्यातही होते. अॅलर्जी टाळण्यासाठी चाचणी आवश्यक असून यातून पुढे होणारी हानी टाळता येते आणि योग्यवेळी अचूक औषधं देण्याचा सल्ला महत्त्वपूर्ण असतो. अॅलर्जीसंबंधी चाचणीत स्किनिंग टेस्ट केली जात असून यातून संबंधित व्यक्तीला अॅलर्जी आहे की नाही हे समजून येते.
या अभ्यासावरून दिसून येते की अॅलर्जी असणा-यांमध्ये विविध प्रकार दिसून येतात. ४३.९३ टक्के रुग्णांना धूळीची अॅलर्जी असते. त्यानंतर फुलातील पराग, बुरशी आणि प्राण्यांचा राग याची अॅलर्जी अनुक्रमे २०.६३ टक्के, १०.५० टक्के आणि १०.३१ टक्के इतकी असते.
अन्नापासून होणा-या अॅलर्जीमध्ये दिसून येणारी लक्षणे
- पित्त, खाज येणे किंवा गजकर्ण. ओठ, चेहरा, जीभ आणि घसा किवा शरीरातील अन्य एखादा भाग सुजणे.
- घसा खवखवणे, नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे. पोटदुखी, डायरिया, मळमळणे किंवा उलटी होणे.
- नैराश्य जाणवणे, हलकी डोकेदुखी किंवा चक्कर येणे.
अॅलर्जी टेस्टींगचं आधुनिक तंत्रज्ञान
अन्न न पचल्याने दिसून येणा-या प्रतिकियेशी फूड अॅलर्जीची सांगड घालणं खूपच सोपं असतं. आज अॅलर्जीकरता होणा-या रक्ताच्या चाचण्या या पूर्वीच्या तुलनेत अधिक सुलभ आणि अचूक असतात. विस्तृत वैद्यकीय इतिहासाशी तुलना करता अॅलर्जीसंबंधी चाचण्यांमुळे तुम्हाला कोणती अॅलर्जीक रिअॅक्शन कशामुळे आली आहे हे अचूकपणे दिसून येते.
Comments
Post a Comment