कांदा खा आणि निरोगी रहा
1) उत्तम आहार हाच उत्तम आरोग्याचा कानमंत्र आहे. आरोग्य नेहमी ठणठणीत ठेवायचे असल्यास कांद्याचे सेवन वाढवले पाहिजे.
2) उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. यामुळेच डॉक्टरही या दिवसांमध्ये भरपूर कांदा खाण्याचा सल्ला देतात.
3) उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही, तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते.
4) कांद्याच्या सेवनामुळे यौन दुर्बलता दूर होण्यास मदत होते.
5) कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे. भरपूर प्रमाणात कांदा खाल्ल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी होते.
6) कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, खनिज, फॉस्फोरस, कॅलरी, लोह असते. तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरताही भरून काढते.
7) कच्चा कांद्याचे सेवन केल्याने अपचनाची समस्या कमी होते.
8) सर्दी, कफ अथवा घशाच्या खवखवीवर कांदा रामबाण उपाय आहे.
9) कांद्याच्या रसात गुळ अथवा मध एकत्र करून पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
10) डायबेटिसचा त्रास असेल तर आहारामध्ये कांद्याचे सलाड म्हणून सेवन केल्यास फायदा होते.
11) कच्च्या कांद्यामध्ये मिथाइल सल्फाइड आणि अमीनो एसिड असल्याने ब्लड प्रेशन नियंत्रणात राहते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंणात राहते व हृदयाचे रक्षण होते.
12) कांद्यामध्ये सल्फर तत्व अधिक असतात. यामुळे पोट, कोलोन, ब्रेस्ट, फुप्फुस आणि प्रोस्टेट कॅंन्सर होण्याचा धोका कमी होतो. तसेच मूत्र संक्रमणाची समस्या नष्ट होते.
13) रोज कांद्याचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
14) कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
15) कांद्याच्या रसात साखर मिक्स करून रिकाम्या पोटी खाल्ल्यास किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.
16) कांद्याच्या रसामध्ये दही, तुळशीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांमध्ये लावल्यास केस गळण्याची समस्या कमी होते.
Comments
Post a Comment