हृदयविकार


 Related image
हृदयविकार म्हणजे काय ?
हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात. जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते मरते. ह्यालाच हृदयविकार म्हणतात.
हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमूळे हृदयाला होणार्‍या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) होतो व त्यामुळे पाऊलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.
हृदयविकार का होतो ?
आपण जसजसे मोठे होत जातो, शरिराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. 
भारतीयांसहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो.
ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :

·         धूम्रपान करणे
·         मधूमेह
·         उच्च रक्तदाब
·         लठ्ठपणा
·         उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल
·         शारिरीक श्रमाची कमतरता
·         अनुवंशिकता
·         तणाव, रागीटपणा आणि चिंता
·         वंशानुगत मुद्दे
काय लक्षणे असतात ?
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. 
सामान्यतः

·         छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
·         घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
·         साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात
·         तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
·         इतर लक्षणे जसे मळमळ, ऊलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
·         काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.
हृदय विकार कसा ओळखला जातो ?
·         डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
·         इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
·         ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.
·         मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
·         हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
·         छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
·         हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे
·         ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.
·         कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी एंजियोग्राम हा निर्णायक साबीत होतो.
हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णास काय प्रथमोपचार द्यावे ?
हृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते.
·         जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.
·         जर क्सिजन सिलेंडर पलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत क्सिजन द्यावे.
हृदयविकारावर काय उपचार असतात ?
·         हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते.
·         पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.
·          हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षीत स्पंदने आढळली तर त्यावर ऊपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते.
·         जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
·         प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते.
·         कितेक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बाईपास सर्जरीचा ऊपयोग केला जातो.
हृदयविकारापासून बचाव कसा करता येतो?
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत :
जीवन शैलीत परिवर्तन:

·         आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मिठ कमी असावे, फाइबर आणि जटिल कार्बोहाइड्रेट उच्च मात्रेत असावे.
·         वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे.
·         शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
·         धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!