रक्तदाब


Related image

रक्तदाब हा आभिसरण होत असलेल्या रक्ताव्दारे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर पडणारा दबाव होय. धमन्या या हृदयातून शरीरातल्या सर्व उती आणि अवयवांना रक्तपुरवठा करतात. हृदयातून धमन्यांमधे रक्त ढकलले जाण्यामुळं आणि धमन्यांव्दारे या रक्ताच्या प्रवाहाला दिला जाणारा प्रतिसाद यांच्या परिणामी रक्तदाब निर्माण होतो.

परंपरेनुसार, एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब हा सिस्टॉलीक । डायस्टॉलीक असा व्यक्त केला जातो, उदाहरणार्थ, 120 / 80. हृदयाचे स्नायू आकुंचन पावून धमन्यांमधे रक्त ढकलले जाते तेव्हा धमन्यांच्या आतल्या भिंतीवर निर्माण झालेला दाब म्हणजे सिस्टॉलीक रक्तदाब (वरची संख्या) होय. आकुंचनानंतर हृदयाचे स्नायू शिथील होतात त्यावेळेला धमन्यांमधील दाब म्हणजे डायस्टॉलीक रक्तदाब (खालची संख्या) होय. हृदय जेव्हा रक्त पंप करत असतं त्यावेळेला रक्तदाब हा उच्च असतो, ते शिथिल असतं तेव्हा नाही. बहुतांश सुदृढ प्रौढांसाठी सिस्टॉलीक रक्तदाब हा पा-याच्या 90 आणि 120 मिलीमीटर्स दरम्यान (ml) असतो. सामान्य डायस्टॉलीक रक्तदाब हा 60 आणी 80 सस फु दरम्यान असतो. विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार सामान्य रक्तदाब हा 120 / 80 पेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते.

कमी रक्तदाब
कमी रक्तदाब (हायपोटेन्शन) हा एक इतका कमी असलेला दाब असतो की त्यामुळं धमन्या आणि शिरांमधून वाहणा-या कमी रक्तप्रवाहामुळं लक्षणं आणि चिन्हं दिसतात. हा कमी रक्तप्रवाह मेंदू, हृदय, आणि मूत्रपिंड यासारख्या महत्वाच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वं पुरवण्यास इतका कमी पडतो, की हे अवयव सामान्यपणे काम करु शकत नाहीत आणि त्यांचं कायमचे नुकसान होऊ शकतं.

उच्च रकत्दाबाच्या तुलनेत, कमी रक्तदाब हा कमी रक्तप्रवाहाच्या चिन्हं आणि लक्षणांनी प्रामुख्यानं व्यक्त केला जातो, विशिष्ट रक्तदाब संख्येनं नाही. काही व्यक्तींना 90 / 50 असा कमी रक्तदाब आसू शकतो आणि त्यांना कमी रक्तदाबाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळं त्यांना कमी रक्तदाब दिसत नाही. तथापि, इतर ज्यांना सामान्यतः उच्च रक्तदाब असतो त्यांचा रक्तदाब 100 / 60 च्या खाली गेल्यास त्यांना कमी रक्तदाबाची लक्षणं दिसू शकतात.

कमी रक्तदाबामुळं डोकं हलकं वाटणे, चक्कर येणे, किंवा उभे राहिल्यानंतर मूर्च्छा येणे अशी लक्षणं निर्माण झाल्यास, त्याला ऑर्थोस्टॅटीक हायपोटेन्शन म्हणतात. सामान्य व्यक्ती उभं राहण्यामुळं निर्माण झालेला कमी दाब हा जलदगतीनं भरुन काढू शकतात. हृदय रोहिणींना (हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरविणा-या रक्तवाहिन्या) रक्त पुरविण्यास जेव्हा रक्तदाब हा अपुरा पडतो तेव्हा, त्या व्यक्तीला छातीत वेदना किंवा हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. मूत्रपिंडांना जेव्हा अपुरं रक्त पुरवलं जातं, तेव्हा मूत्रपिंडं ही शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढू शकत नाहीत, उदाहरणार्थ, युरिया आणि क्रिएटीनाईन, आणि त्यांची रक्तातील पातळी वाढते. झटका बसणे ही जीवाला घातक अशी स्थिती असून सातत्यानं कमी रक्तदाब राहिल्यानं मूत्रपिंडं, यकृत, हृदय, फुफ्फुसं, आणि मेंदूचं कार्य झपाट्यानं खालावतं.

उच्च रक्तदाब
130 / 80 या पातळीच्या वरचा रक्तदाब हा उच्च समजला जातो. उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन म्हणजे रक्तवाहिन्यातील उच्च दाब (टेन्शन). उच्च रक्तदाब याचा अर्थ, अति भावनिक ताण नव्हे, तथापि भावनिक ताण आणि तणाव यांच्यामुळं रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो. सामान्य रक्तदाब हा 120 / 80 पेक्षा कमी असतो, 120 / 80 आणि 139 / 89 च्या दरम्यानचा रक्तदाब याला पूर्व-हायपरटेन्शन म्हणतात, आणि 140 / 90 किंवा त्याहून जास्त रक्तदाब हा उच्च समजला जातो.

उच्च रक्तदाबामुळं हृदयरोग, मूत्रपिंडाचा रोग, धमन्या कठीण होणे, डोळ्यांचे नुकसान होणे किंवा मेंदूला इजा होणे यांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबाचे निदान होणे महत्वाचे आहे त्यामुळं रक्तदाब हा सामान्य ठेवणं आणि गुंतागुंत टाळणं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Comments

Popular posts from this blog

गव्हांकुराच्या रसाचे फायदे (Wheat Grass)

आजार व त्यावरील उपाय

वडाच्या झाडाचे औषधी महत्व..!